Buddha Poornima Celebration

नागार्जुनात “भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर” व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन

मैत्रेय एजूकेशनल सोसायटी द्वारा संचलित नागार्जूना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविदयालयात “भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर” या व्याख्यानमालेतील तिसरे व अंतिम पुष्प आज बुद्ध जयंती निमित्ताने दि. ०४/०५/२०२३ ला सकाळी ९:०० वाजता गुंफण्यात आले. व्याख्यानमालेचा आजचा विषय “भगवान बुद्ध: विज्ञान व वैद्यकीय शास्त्र ” असा होता.

व्याख्यानमालेचे उदघाटन संस्थेचे सचिव मा. श्री. अजय वाघमारे ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. संजय आवटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मंगेश दहिवले, प्राचार्य डॉ संजय केलो, समन्वयक श्री. राहुल ब्राह्मणे आणि कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. कल्याणी फुलझेले या वेळी उपस्थितीत होते.
दिपप्रज्वला नंतर डॉ अशोक कांबळे (बोधी अशोक) यांनी बुद्धवंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली.

संस्थेचे सचिव माननीय श्री अजय वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रमुख पाहुणे व उपस्तितांचे स्वागत केले तसेच व्याख्यानमाला आयोजनाचे उद्धिष्ट स्पष्ट केले व आजच्या विषयाची पार्श्वभूमीवर मांडली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ अशोक कांबळे (अध्यक्ष, मैत्रेय बोध संस्था, यवतमाळ) यांनी आपल्या भाषणात बुद्ध आणि धम्म म्हणजे काय ते समजून सांगितले. सत्य समजण्याचा मार्ग म्हणजे धर्म होय असे प्रतिपादन त्यांनी केले. मनुष्याने नेहमीच सत्यसदाचारी राहिले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी मानवी जीवनातिल ध्यानाचे महत्व पटवून दिले. विपश्यना मध्ये मनोविज्ञान, बुद्धविज्ञान, धम्मविज्ञान, तत्वविज्ञान कशाप्रकारे अंतर्भूत होतात हे देखील स्पष्ट केले व स्वतः ला समजण्याची व माणुसकीला समजून घेण्याच्या कलेद्वारे स्वानुभव साध्य करता येतो असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मंगेश दहीवले (प्रख्यात बौद्ध विचारवंत) यांनी मानवी जीवनातील विश्लेषणात्मक पद्धत आणि रिलेशनल पद्धत यातील फरक समजावून सांगितले तसेच मानवाने नेहमीच वैज्ञानिक पद्धतीचे निरीक्षण, अनुमान आणि कृती विकसित करण्यासाठी चिंतनशील विचारसरणी चा अवलंब करावा लागेल असे त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नमूद केले.

डॉ.एस.खान, प्रा. अमित मेश्राम, प्रा.बिना रेवतकर, प्रा.अतुल आकोटकर, डॉ.योगेश बैस, प्रा.अश्विनी वालदे, प्रा. संजय बनकर, प्रा. मनिष थुल, प्रा.शुभम इंगोले, प्रा.वैष्णवी ठमके, डॉ.जयगोपाल अंबादे, प्रा. संदिप ठाकरे, प्रा.रसिक उपाध्याय, प्रा.चार्ली फुलझेले, प्रा. सचिन मते, प्रा. स्वाती सोनटक्के, प्रा. हर्षा मेश्राम, प्रा. मयूर मालते, प्रा. वैष्णवी बोपचे आणि यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. दिक्षा बनसोड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. वृषाली पराये यांनी प्रमुख पाहुण्यांचा तसेच प्रा. जयेश तांदुळकर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. कल्याणी फुलझेले यांनी आभार प्रदर्शन केले.

  • Shape
Latest

CoursesEvents