मैत्रेय शैक्षणिक संस्थेला महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे ‘शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक’ बहाल करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १२ मार्च, २०२४ मंगळवार रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन आदरणीय श्री. एकनाथ शिंदे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळीश्री. अजित पवार मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य , श्री. रामदास आठवले मा, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, श्री. दीपक केसरकर मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री, मुंबई शहर, श्री. राहुल नार्वेकर मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, श्री. मंगलप्रभात लोढा मा. मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर, श्री. अरबिंद सावंत मा. लोकसभा सदस्य, श्री. सुमंत भांगे (भा. प्र. से.) सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, श्री. ओम प्रकाश बकोरिया (भा. प्र. से.) आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, श्रीमती वंदना कोचुरे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, कोकण विभाग आदी मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थितीत होते.

याप्रसंगी सन २०२०-२१ करीता महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे “शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक” नागपुर येथील मैत्रेय शैक्षणिक संस्थेला देऊन गौरविण्यात आले. श्री. सुमंत भांगे (भा. प्र. से.) सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग व श्री. ओम प्रकाश बकोरिया (भा. प्र. से.) आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते हे पारितोषिक अध्यक्ष इंजि. मदन माटे यांनी संस्थेच्या वतीने स्वीकारले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. १५ लाख (पारितोषिकाची रक्कम), स्मृतीचिन्ह, चांदीचा स्क्रोल व सन्मानपत्र असे होते.

मैत्रेय शैक्षणिक संस्थेची स्थापना २००९ साली करण्यात आली होती. सदर संस्थे द्वारे सामाजिक बांधिलकी व सामाजिक ऋण फेडण्याच्या उद्देशाने संचालित नागार्जुना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ग्राम- सातनवरी, अमरावती रोड, नागपूर हे मध्य भारतातील दर्जेदार अभियांत्रिकी व व्यवस्थापनाचे शिक्षण देणारे महाविद्यालय आहे, जिथे समस्त मागासवर्गीय जातीच्या मुलामुलींना पूर्णपणे मोफत व गरीब घरातील होतकरू मुलामुलींना अतिशय अल्प अश्या माफक दरात शिक्षण दिले जाते. तसेच संस्थेमार्फत सामाजीक बांधीलकीच्या दृष्टीने ना नफा ना तोटा या तत्वावर अभियांत्रीकी व व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेणा-या ग्रामीण दुर्गम व आदिवासी प्रदेशातील गरीब व होतकरु विदयार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामधे निवासाची व महाविद्यायालयात जाण्यायेण्याची निःशुल्क सेवा, मोफत पुस्तक, व्यक्तीमत्व विकास, एमपीएससी व युपीएससी परीक्षाची तयारी तसेच बारावित शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांसाठी मोफत एमएचसीईटी व जेईई चे वर्ग घेतले जातात. तसेच सर्व गुणवंत, होतकरु व गरीब विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात विशेष सुट दिली जाते. विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य सुंदर व उज्वल करण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता दर वर्षी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

संस्थेच्या वतीने निरंतर करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली याबद्दल संस्थेच्या विश्वस्तांच्या वतीने अध्यक्ष इंजि. मदन माटे व सचिव श्री. अजय वाघमारे यांनी राज्य शासनाने आभार व्यक्त केले. ‘शाहू, फुले, आंबेडकर’ पारितोषिका करीता पात्र ठरलेली मैत्रेय शैक्षणिक संस्था ही विदर्भातील एकमेव संस्था असणे ही अत्यंत गौरवशाली बाब आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले यांनी केले व संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत राहील अशी आशा व्यक्त केली.

  • Shape
Latest

CoursesEvents