नागार्जुनात’ उल्हास 2023 वार्षिक उत्सव थाटात संपन्न

मैत्री एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचलित नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सातनवरी येथे 28 व 29 एप्रिल 2023 ला वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. संजय दुधे आजी कुलगुरू आरटीएमयू नागपूर यांच्या हस्ते झाले. यावेळेस स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे, मैत्री एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष मा. इंजि मदन माटे, सेक्रेटरी मा. संजय वाघमारे, प्राचार्य संजय केलो, उपप्राचार्य मा.मुरलीधर रहंगडले, संयोजक संदीप ठाकरे आणि विद्यार्थी प्रतिनिधी आशिक कापसे आणि माधवी गेडाम उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली प्रा. स्वाती सोनटक्के व प्रा. अमित मेश्राम यांनी स्वागत पर गीत सादर केले.
भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून व द्वीप प्रज्वलन करून पुढील सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे संजय दुबे यांचे भाषण झाले व त्यानंतर स्टँड अप कॉमेडियन व रील व्हिडिओची सनसेस्नल सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाणारी नेहा ठोंबरे यांनी आपल्या वऱ्हाडी भाषेत विद्यार्थ्यांची संवाद साधला व काही शॉर्ट रिल्स प्रयोगही सादर केले. या स्नेहसंमेलनामध्ये विविध रंगारंग कार्यक्रम घेतला गेलेत कार्यक्रमाची सुरुवात गायन संगीत याने झाली प्रशिक्षक म्हणून डॉ. रामकृष्ण छांगणी (जॉईंट सेक्रेटरी आरटीएम कॅन्सर हॉस्पिटल) लभले. गायनाचे संचालन सीएससी डिपार्टमेंटचे विद्यार्थी सृष्टी वाघचवरे व हर्ष प्रसाद यांनी केली. गायनाच्या सदाबहार कार्यक्रमानंतर फॅशन शो आयोजित करण्यात आले. याला आयकॉनिक सेलेब्रिटी आयुषी लाडे. ( इग्नाइट अकॅडमी) प्रशिक्षक म्हणून उपस्थित होत्या याचे संचालन जानवी कटरमल ने केले.
28 29 चालणाऱ्या उल्हास 2K23 मध्ये 29 ला वादविवाद स्पर्धा,नृत्य सादरीकरण व नाटक अशा स्पर्धा घेण्यात आल्या. याचे संचालन तिश्मिता कापसे व पायल मेश्राम हिने केले. 29 ला बक्षीस वितरणाचा समारंभ मि. मिर्झा बेग (अटलांटा चे व्यवस्थापक) यांच्या हस्ते झाला. NIETM आयडॉल चा मान राहुल मेश्राम याला मिळाला, तसेच मिस्टर अँड मिस एनआयटीएम जय नवघरे आणि कृतिका डोंगरे ठरलेत. डॉ साजिदुल्लाखान, डॉ. योगेश बैस, डॉ. कुशाल यादव, डॉ. जयगोपाल अंबादे, डॉ. मोईन देशमुख, प्रा. संजय बनकर, प्रा.चार्ली फुलझेले प्रा. सचिन मते, प्रो. रसिक उपाध्याय, प्रा. अतुल अकोटकर, प्रा. वृषाली पराये, प्रा.अश्विनी वालदे, प्रा. प्रशिलकुमार इंगळे, प्रा. प्रिया फरकाडे, प्रा. कल्याणी फुलझेल, प्रो. दीक्षा बनसोड, प्रो. जयेश तांदुळकर प्रो. शुभम इंगोले प्रो. आतिफ नवाब प्रो. मयूर मालते, प्रो.फाजेला फारोज, प्रो. बिना रेवतकर, सहाय्यक नम्रता नाईक, वैष्णवी बोपचे, वैष्णवी ठमके आदी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन जानवी अहिरे व जानवी कटरमल या विद्यार्थ्यांनी केले.

  • Shape
Latest

CoursesEvents