नागार्जुनात ‘उल्हास-२०२५’ चा थाटात समारोप

नागपूर : मैत्रेय शैक्षणिक संस्थे द्वारा संचालित नागार्जुना इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सातनवरी येथे १ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत वार्षिक महोत्सव ‘उल्हास २०२५’ साजरा करण्यात आला.
स्नेहसंमेलनामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गायन स्पर्धे करीता प्रशिक्षक म्हणून सौ. शालिनी सिन्हा व प्रा. अमित मेश्राम लाभले होते. संचालन संदली मेश्राम व आदित्य लंगडे यांनी केले. फॅशन शो करीता एम जे रुपम व झीनत बेग प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. संचालन सुहानी बागडे व कौशिक रंगारी यांनी केले. अंताक्षरीचे सूत्रसंचालन प्रा. अमित मेश्राम यांनी केले.

०५ एप्रिल २०२५ ला समारोप कार्यक्रमाच्या दिवशी मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे सचिव मा. श्री. प्रदिप नगरारे, कोषाध्यक्ष कुलदिप रामटेके, प्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले, संयोजक प्रा. दिक्षा बनसोड विद्यार्थी प्रतिनिधी हर्ष प्रसाद व श्रुष्टि वाघचौरे उपस्थित होते. बक्षीस वितरण कार्यक्रम प्रमुख पाहुणे डॉ. देबाशिष भौमिक, असोसिएट डीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आरटीएमएनयू, नागपूर व सन्माननीय पाहुण्या सौ. वैशाली चौधरी सरपंच, सातनवरी यांच्या हस्ते पार पडला. एनआयइटीएम स्टुडंट ऑफ द इयर चा मान हर्ष प्रसाद याला मिळाला. मिस्टर अँड मिस एनआयइटीएम शंतनु राठोड आणि मान्या दुबे ठरले. संचालन चैतन्य वासनिक व जानवी आहेर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सृष्टी वाघचौरे हिने केले. मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अजय वाघमारे यांनी ‘उल्हास २०२५’ च्या आयोजकांचे व सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विजेत्यांचे अभिनंदन देखील केले.

Latest Events

  • Shape
Latest

CoursesEvents