International Conference 2023

नागार्जुनातील आंतरराष्ट्रीय परिषदेत तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासावर वैचारिक मंथन.- कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी.
(देश विदेशातील संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

मैत्रेय एज्युकेशनल सोसायटी च्या, “नागर्जुना इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग, टेकनलॉजि अँड मॅनेजमेंट,” तर्फे, “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मल्टिडिसीप्लिणरी अप्रोच इन टेक्नॉलॉजी ऍण्ड सोसिअल डेव्हलपमेंट (ICMTSD -2023) चे यशस्वी आयोजन दि.२६ मे २०२३ रोजी करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन दि.२६ मे २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, मैत्रेय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि.मदन माटे, सचिव अजय वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय केलो, सल्लागार राहुल ब्राह्मणे व निमंत्रक डॉ. मुरलीधर रहांगडाले मंचावर उपस्थित होते.
उपप्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाची पार्श्वभूमी बद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे विशेष अतिथी कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय परिषदेसारख्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले व परिषदेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात शिकण्याचा अनुभव वाढविण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल संसाधने वापरण्यावर देखील भर देणें आवश्यक आहे असे नमूद केले.
तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) द्वारे कौशल्य विकास, बहु-अनुशासनात्मक शिक्षण आणि सर्जनशीलता आणि गंभीर विचारांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण आणि एकात्मिक शैक्षणिक दृष्टिकोनाची कल्पना करते असे सांगितले. न्युयॉर्क अमेरिका येथील मॉर्गन स्टॅन्लीचे व्हाइस प्रेसिडेंट धर्मेंद्र अवसरमोल यांच्या बीज भाषणाने परिषदेची सुरुवात करण्यात आली. त्यांनी आपल्या बीज भाषणात कश्या प्रकारे नवनवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण सामाजिक क्रांती घडवून आणू शकतो यासंदर्भात भाष्य केले. त्यानंतर सात सत्रांच्या माध्यमातून १३५ शोध निबंध प्रस्तुत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख वक्ते, सत्राचे अध्यक्ष आणि विषय तज्ञ यांचे स्वागत प्रा. कुशल यादव, प्रा.अतुल आकोटकर, प्रा.अश्विनी वालदे, प्रा.स्वाती सोनटक्के या संनव्यय समिती तर्फे करण्यात आले. ह्या परिषदेत देश विदेशातील विविध विषयावर संशोधन पर १८६ पेपर आले होते. शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अंदाजे २७५ प्रतिनिधीनीं फेसबुक लाईव्ह व युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून परिषदेचा लाभ घेतला.
दि. २७ मे २०२३ रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता करण्यात आली यावेळी डॉ.अनुज शर्मा, डॉ. तालिब, डॉ. एल.एन.शनवरे, डॉ.एस.खतीब, डॉ.के.एन.वाघ, डॉ. व्ही.जी.उमाळे, डॉ.दिनेश हरकूट आदि मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक सत्रात सर्वोत्तम शोधनिबंध आणि सर्वोत्तम सादरीकरण असे दोन पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यमन येथील संशोधन अभ्यासक इब्राहिम फकली यांनी ICMTSD-2023 या आंतरराष्ट्रीय परिषदे बद्दल अभिप्राय देतांना परिषदेच्या प्रयोजनाचा उद्देश साध्य झाला असे नमुद केल तसेच उत्कृष्ट नियोजनाची स्तुती देखील केली. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन घेण्यात आलेल्या अभिप्रायांमध्ये सर्वांनीच परिषद आयोजनाच्या उद्देश्य पूर्ततेची पोचपावती दिली तसेच महाविद्यालयाच्या या उपक्रमा बद्दल व भविष्यातिल पुढील वाटचालीं करीता भरभरून शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय परिषदेला यशस्वी करण्याकरिता डॉ.एस.खान, प्रा.बिना रेवतकर, प्रा.प्रिया फरकाडे, प्रा.दिक्षा बनसोड, डॉ.योगेश बैस, प्रा.दर्शना खडसे, प्रा.संजय बनकर, प्रा.मनिष थुल, प्रा.कल्याणी फुलझेले, प्रा.आतिफ नवाब, प्रा.जयेश तांदुळकर, प्रा.शुभम इंगोले, प्रा.वैष्णवी ठमके, डॉ.जयगोपाल अंबादे, प्रा. संदिप ठाकरे, प्रा. सचिन मते, प्रा.रसिक उपाध्याय, प्रा.चार्ली फुलझेले, डॉ. मोईन देशमुख, प्रा. हर्षा मेश्राम, प्रा.मयूर मालते, प्रा. वैष्णवी बोपचे आणि यांच्यासह विद्यार्थी स्वयंसेवक या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. प्रा.फझला फरोज यांनी कार्यक्रमांचे संचालन केले. प्रा.वृषाली पराये यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच प्रा.अमित मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संयोजक प्रा.कुशल यादव यांनी आभार मानले.

  • Shape
Latest

CoursesEvents