Celebration of Buddha Purnima

नागार्जुनात “भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर” व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सपन्न
(आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे : डॉ. सविता सुमेध कांबळे)

मैत्रेय शैक्षणिक संस्थे द्वारा संचलित नागार्जूना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविदयालयात “भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर” या व्याख्यानमालेतील तिसरे व अंतिम पुष्प आज बुद्ध जयंती निमित्ताने दि. २२/०५/२०२३ ला सकाळी ११:३० वाजता गुंफण्यात आले.

व्याख्यानमालेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सविता सुमेध कांबळे ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. के. रहांगडाले आणि कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. अश्विनी वालदे मंचावर उपस्थितीत होते. दिपप्रज्वला नंतर प्रा. अश्विनी वालदे यांनी बुद्धवंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रा. अमित मेश्राम यांनी सुमधुर धम्म गित गायले व त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या डॉ सविता सुमेध कांबळे यांचा उपस्तितांना परिचय करून दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सविता सुमेध कांबळे (प्रख्यात पाली भाषा तज्ञ, बौद्ध व डॉ. आंबेडकरी विचारवंत) यांनी आपल्या भाषणात अष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे असे सांगितले. सम्यक् दृष्टी, संकल्प, वाचा, कर्मान्त, आजीविका, व्यायाम, स्मृती, समाधी या विषयी विस्तृत माहिती दिली. वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय आहे असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी नमूद केले.

डॉ.एस. एस. खान, प्रा. अतुल आकोटकर, प्रा. बिना रेवतकर, प्रा. प्रिया फरकाडे, प्रा. सोनल तिवारी, प्रा. पल्लवी राजाभोज, डॉ.योगेश बैस, प्रा. संजय बनकर, प्रशिल इंगळे, प्रा. मनिष थुल, प्रा. आतिफ नवाब, प्रा.शुभम इंगोले, प्रा.जयेश तांदुळकर, प्रा. वृषाली पराये, डॉ.जयगोपाल अंबादे, प्रा. संदिप ठाकरे, प्रा. सचिन मते, प्रा.रसिक उपाध्याय, प्रा.चार्ली फुलझेले, प्रा. सुधीर गोवर्धन, प्रा. स्वाती वाघमारे, प्रा. हर्षा मेश्राम, प्रा. क्षितिज चौहान, प्रा. प्रियंका यादव, डॉ. सुषमा त्रिवेदी, प्रा. वैष्णवी बोपचे, नम्रता नाईक, यश सावरकर आणि यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. कल्याणी फुलझेले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. अश्विनी वालदे यांनी आभार प्रदर्शन केले.

  • Shape
Latest

CoursesEvents