नागार्जुना अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘उल्हास २०२५’ वार्षिक क्रीडा महोत्सवासाचे यशस्वी आयोजन.

नागपूर: मैत्रेय शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित नागार्जुना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सातनवरी येथे ‘उल्हास २०२५’ वार्षिक क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात क्रिकेट, फुटबॉल, बास्केट बॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, ऍथलेटिक्स तसेच बॅडमिंटन, कॅरम, बुद्धीबळ यासारखे विविध क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. शरद सुर्यवंशी, संचालक क्रिडा व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अजय वाघमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले, उल्हास २०२५ समन्वयक प्रा. दिक्षा बनसोड, क्रीडा प्रमुख प्रकाश इंगळे व इतर प्राध्यापक मंडळी उपस्थित होती.

उ‌द्घाटनप्रसंग्री भाषणामध्ये डॉ. मुरलीधर रहांगडाले यांनी सांगितले की विविध खेळांमध्ये सहभागी होऊन, विद्यार्थी सांघिक कार्य, कठोर परिश्रम आणि स्वयं-शिस्त यांचे महत्त्व शिकतात. तसेच एकजुटीने काम करणे किती महत्त्वाचे असते व जर एकत्रितपणे काम केले तर कुठल्याही कठीण प्रसंगावर आपण सहज रीतीने मात करू शकतो असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी विद्यार्थी दशेत मैदानी व इतर खेळाचे किती अनन्य साधारण महत्व आहे हे पटवुन दिले. जो विद्यार्थी खेळात सक्रिय असतो, त्याला स्वाभाविकपणे जास्त आत्मसन्मान, सुधारित सामाजिक संवाद आणि जीवनाबद्दल अधिक सकारात्मक दृष्टिकोन असतो. क्रीडा उपक्रमांमुळे मुलांना नैतिकता, जबाबदारी, शिस्त, आत्मविश्वास आणि परस्पर विश्वासाची भावना असे मूल्ये प्राप्त होतात असे आपल्या संबोधनात प्रतिपादित केले.

‘उल्हास २०२५’ क्रीडा महोत्सव सचिव, हर्ष प्रसाद याने विद्यार्थ्यांकडुन क्रीडा प्रति समरस होण्याची शपथ ग्रहण करून घेतली. महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख प्रा. प्रकाश इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्च-पास्टचे यशस्वी संचालन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल सामन्यातील सर्व खेळाडुं सोबत भेटुन विधिवत फुटबॉलला किक मारून सामन्याची सुरुवात केली व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

कु. संचेती बरसागडे व प्रज्वल वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर क्रीडा प्रमुख प्रकाश इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे सचिव मा. प्रदीप नगरारे व कोषाध्यक्ष कुलदीप रामटेके यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

Latest Events

  • Shape
Latest

CoursesEvents