नागार्जुना अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये ‘उल्हास २०२५” वार्षिकोत्सवाचे यशस्वी आयोजन

नागपूर : मैत्रेय शैक्षणिक संस्थे द्वारा संचालित नागार्जूना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट ग्राम :सातनवरी, अमरावती रोड, नागपूर येथे ‘उल्हास २०२५’ या वार्षिकोत्सवात विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि.०४ एप्रिल २०२५ ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन
उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणेश्री. स्पर्श अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, श्रेया प्लास्टो बाथवेअर प्रायव्हेट लिमिटेड, ​​नागपूर व सन्माननीय पाहुणे श्री. राजकुमार त्रिपाठी, एपीआय कोंढाली पोलिस स्टेशन, नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाला मैत्रेय शैक्षणिक संस्थे अध्यक्ष श्री. अजय वाघमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले, कार्यक्रमांचे संयोजक प्रा. दिक्षा बनसोड, विद्यार्थी प्रतिनिधी हर्ष प्रसाद व सृष्टी वाघचौरे उपस्थित होते. पारंपरिक दीप प्रज्वालानंतर प्रमुख पाहुणे व मंचावर उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा व क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. प्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात वार्षिक घडामोडींचा आढावा घेतला व नुकत्याच झालेल्या नॅकच्या परीक्षणा मध्ये बी++ श्रेयांक मिळविण्यासाठी महाविद्यालयाने कश्या प्रकारे शर्थीचे प्रयत्न केले याविषयी माहिती दिली. महाविद्यालय कशाप्रकारे उत्तरोत्तर प्रगती करीत आहे व मागील वर्षी यशस्वी रीतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद, मेगा प्लेसमेंट ड्राइव्ह, विद्याशाखा विकास कार्यक्रम (FDP), विद्यार्थी विकास कार्यक्रम (SDP) यासमस्त उपक्रमां बद्दल सविस्तर माहिती देखील दिली.
सन्माननीय पाहुणे श्री. राजकुमार त्रिपाठी यांनी हे महाविद्यालय इतर अभियांत्रिकी महाविद्यालया पेक्षा कसे अद्वितीय आहे व इथे शैक्षणिक गुणवत्ते सोबतच सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे जोपासली जाते याबद्दल संतोष व्यक्त केला. प्रमुख पाहुणे श्री. स्पर्श अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असलेल्या उपलब्ध सोईसवलतिंचा फायदा करून आपले उज्वल भवितव्य घडवावे असा मोलाचा सल्ला दिला. महाविद्यालयाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशीही अपेक्षा व्यक्त केली व महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासा करीता शुभेच्छा दिल्या.
मा. श्री. अजय वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सदर सांस्कृतिक महोत्सवात नृत्य, गायन, नाटक, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, अंताक्षरी, मिस्टर अँड मिस पर्सनॅलिटी, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, स्टॅन्डअप कॉमेडी, पोस्टर स्पर्धा, आनंद मेळावा, बेस्ट फ्रॉम वेस्ट व फॅशन शो अश्या अनेक नवनविन कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे असे सांगितले. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल व त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
त्तपश्यात स्टँडअप कॉमेडीयन, आयुष मिश्रा यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत मंचावर विविध प्रकारच्या मनोरंजक क्रियाकलापही केले. मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे सचिव मा. श्री. प्रदिप नगरारे व कोषाध्यक्ष मा. श्री. कुलदीप रामटेके यांनी ‘उल्हास २०२५’ या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजना करीता शुभेच्छा दिल्या. प्रा. स्वाती जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच श्रुष्टि वाघचौरे हिने आभार प्रदर्शन केले.

Latest Events

  • Shape
Latest

CoursesEvents