NAAC accords B++ grade to Nagarjuna Institute of Engineering, Technology and Management.
Nagarjuna Institute of Engineering, Technology and Management, Nagpur run by Maitrey Educational Society, Nagpur has secured B++ grade with 2.96 CGPA ...
नागपूर : मैत्रेय शैक्षणिक संस्थेद्वारा संचलित नागार्जुना इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयात ‘भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या व्याख्यानमालेतील पाहिले व दुसरे पुष्प महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने दि. १२ एप्रिल रोजी दुपारी ०२:०० वाजता गुंफण्यात आले. व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रदिप नगरारे, उपाध्यक्षा श्रीमती भावना सुखदेवे व इंजि. जगदीश सुखदेवे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल हिरेखान, कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे डॉ. संजय शेंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले, कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. स्वाती जाधव व प्रा. अश्विनी वालदे या वेळी विचार मंचावर उपस्थितीत होते. तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण केल्यानंतर मीना गोडघाटे व पुर्वा मेश्राम यांनी सुमधूर भीमगित सादर केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुरलीधर रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची विस्तृत माहिती दिली व आजच्या विषयाची पार्श्वभूमी मांडली. तदनंतर मैत्रेय शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती. भावना सुखदेवे व इंजि. जगदीश सुखदेवे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजना करीता तसेच महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर प्रगती करीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल हिरेखान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या वैचारिक क्रांतीबद्दल माहिती दिली. आजच्या नव्या पिढीने समाज सेवेच्या व्रताचा अंगीकार करावा असे त्यांच्या भाषणात त्यांनी नमूद केले.
महात्मा जोतिबा फुलेंनी समकालिन विषमतेवर नुसते कोरडे ओढले नाहीत, तर त्यांनी समाजातील दुर्लक्षितांचा आवाजही बुलंद केला. त्यांना अपक्षित असलेल्या सामाजिक समतेचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत पहायला मिळते. त्यामुळे संविधानाचा आदर हाच फुलेंच्या विचाराचा जागर आहे, असे मत कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे प्रख्यात संशोधक व लेखक डॉ. संजय शेंडे यांनी व्यक्त केले.
मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे सचिव मा. श्री. प्रदिप नगरारे यांनी उद्याचा भारत हा आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे, म्हणून त्यांनी आपले सामाजिक मूल्य जपली पाहिजे व संविधानाने आपल्याला दिलेले अधिकारा बाबत सजग असावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अजय वाघमारे व कोषाध्यक्ष मा. श्री. कुलदिप रामटेके यांनी व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजना करिता आयोजकांचे कौतुक केले. प्रा. प्रिया फरकडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा तसेच प्रा. अमित मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथींचा परिचय करून दिला. कु. सुहानी बागडे हिने सुत्र संचालन व कु. आरती वासनिक हिने आभार प्रदर्शन केले.