Celebration of Buddha Purnima
नागार्जुनात "भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आं ...
नागार्जुना अभियांत्रिकीच्या महा रोजगार मेळाव्यात ६११ उमेदवारांची निवड
२५/०२/२०२३ रोजी ग्राम सातनवरी अमरावती रोड स्थित नागपूर येथिल नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नागपूर यांनी आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात तीस बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यानीं सहभाग नोंदवला. त्यामध्ये नागपूर, अमरावती व विदर्भातील १२४५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातील ६१० उमेदवारांची निवड झाली.
या मेळाव्याचे उद्घाटन महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक श्री. निखिल मेश्राम यांच्या हस्ते व कौशल्य विकासचे उपायुक्त श्री. प्रकाश देशमाने, अध्यक्ष इंजि. मदन माटे, सचिव श्री.अजय वाघमारे यांच्या उपस्थितीत झाले. श्री. निखिल मेश्राम यांनी आपल्या भाषणात, नजीकच्या काळात मेट्रोसह अनेक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच युवकांनी कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेतले तरी आय टी क्षेत्रात भरपूर अनेक पदांवर नोकऱ्या मिळत आहेत. ह्या रोजगार मेळाव्यात उपस्थित उमेदवारांनी रील्स व सोशल मीडिया वर जास्त वेळ न घालवता अभ्यास पुर्ण गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री. मदन माटे ह्यांनी विदर्भातील जास्तीत जास्त उमेदवारांची निवड करून राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याची विनंती उपस्थित कंपन्यांना केली. नागार्जुनाचे रोजगार मेळाव्याचे आयोजन एक स्तुत्य उपक्रम असून,आम्ही कौशल्य भारत अभियानात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
ह्या प्रसंगी निमंत्रक प्राचार्य डॉ. संजय केलो ह्यांनी प्रस्तावना केली व समन्वयक डॉ साजिद खान ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. ह्या वेळी मंचावर उपप्रचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले, एन आय टी एम सल्लागार श्री. राहुल ब्राम्हणे उपस्थित होते. संचलन प्रा. स्वाती सोनटक्के ह्यांनी केले. प्रा. बिना रेवतकर, प्रा. अतुल आकोटकर, डॉ.योगेश बैस, प्रा.कुशाल यादव, डॉ.जयकुमार अंबादे, डॉ.सूरज देशमुख, प्रा.वृषाली पराये, प्रा.दर्शना खडसे, प्रा.वैष्णवी ठमके, प्रा.प्रिया फरकाडे, प्रा. आश्विनी वालदे, प्रा. हर्षा मेश्राम, प्रा. रसिक उपाध्ये, प्रा. चार्ली फुलझेले, प्रा. संदीप ठाकरे, प्रा. आतिफ नवाब, प्रा. शुभम इंगोले आणि प्रा. जयेश तांदुळकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.