Celebration of Buddha Purnima
नागार्जुनात "भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आं ...
मैत्रेय शैक्षणिक संस्थे द्वारा संचलित नागार्जूना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविदयालयात ‘भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर’ व्याख्यानमालेचे उद्घाटन १२/०४/२०२४ ला दुपारी २:०० वाजता करण्यात आले. व्याख्यानमालेतील पहिले पुष्प महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुंफण्यात आले.
व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या विदर्भातील प्रख्यात नामवंत महिला पत्रकार मा. संध्या राजुरकर ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष इंजि. मदन माटे, सचिव अजय वाघमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. चार्ली फुलझेले व संयोजिका प्रा. दिक्षा बनसोड मंचावर उपस्थितीत होते. तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रा. माधुरी भैसारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महात्मा ज्योतीबा फुले यांचे जीवन चरित्र व त्यातील विलक्षण क्षण ज्यामुळे फुले हे महात्मा फुले झाले याची विस्तृत माहिती दिली. तसेच व्याख्यानमालेच्या आयोजनाचे उद्दिष्ट उपस्थितांना समजून सांगितले. त्यानंतर प्रज्वल वाघमारे याने आपल्या भाषणात फुले हे समाजसुधारक नसून ते एक सामाजिक आद्य क्रांतिकारक होते असे नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संध्या राजुरकर यांनी सांगितले की सर्व समाजाने संविधानाचा आदर केला तरच महात्मा फुलेंच्या समतेच्या विचारांचा प्रसार होईल. तसेच महात्मा फुलेंनी घडवूनआणलेल्या वैचारिक क्रांती बद्द्ल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत शिक्षणा बरोबर पत्रकारिता क्षेत्रात देखील लिखाण कार्य करून फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वसा जपावा असे आव्हान त्यांनी आपल्या भाषणात केले.
या प्रसंगी महात्मा फुले यांच्या जयंती प्रित्यर्थ महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने भव्य पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथपाल प्रतीक ढेपे यांनी पुस्तक प्रदर्शनी करीता अथक परिश्रम घेतले. व्यंकटेश बोन्द्रे याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पलक पराड हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. चार्ली फुलझेले यांनी आभार प्रदर्शन केले.